आमचे एक मास्तर असायचे - श्रीयुत एस आर तेंडुलकर! सचिन रमेश तेंडुलकर नव्हे. हे कुणी भलतेच. पण साहेबांना शिकवायची खूप आवड. वर्गात आल्या आल्या त्यांनी म्ह्ट्लं: पहिल्यांदा मी ह्याच कॊलेज मध्ये १९७१ साली शिकवलं होतं. अहो मास्तर, कशाला ३० वर्ष जुनी गोष्ट आठवुन तुमच्या धैर्याचा परिचय आत्ताच करवुन देता? अजुन आहे ना आपल्याकडे वर्षभर?!
वर्ग सुरु झाल्यावर मास्तरांनी उदाहरण दिले एका हिंदी चित्रपटाच्या नावाने: त्याकाळी हा एक चित्रपट सुपरफ्लॊप होता - रेहना है तेरे दिलमें. मास्तरांना हे एवढं चित्रपट आवडलं कि त्यांनी आम्हाला धमकावलं की मी जे काही शिकवतोय त्यासाठी एक लक्ष्यात ठेवावं: रेहना है तेरी खोपडी में! आता हे तर सर्वांनाच माहित असायचं कि "रेहना है तेरी खोपडी में" फक्त परिक्षापर्यंत, आणि परिक्षा संपली की खोपडीतून सगळंच दिवसाढवळ्या छूमंतर!
मास्तरांना मोबाईल फोनची विशिष्ठ आवड. म्हणूनच साहेब कान लावुन कोण कसले गप्पा मारत बसतात फोनवर, त्याचे अभ्यास करुन आम्हाला शिकवायचे! "कच्छी लोकं फ़ोनवरच अक्ख्या कुटुंबाचा विवरण घेतात - जोरात 'कीं आयो' म्हणून ओरडतात, तर मलयाळी गुरुंना काही ऐकु येई ना! 'हलो... कोन? क्या? अच्छा... कोन? क्या? .... क्या रे... कोन बोलता रे कुछ समझ में नहि आता'..."
आज काही मित्रांबरोबर बसुन पुढच्या वर्षात येणार्या सुपरफ्लॊप हिंदी चित्रपटांविषयी बोलताना मला तेंडुलकर साहेबांची आठवण झाली. एका मित्राने सांगितलं - "गुरु"चा ट्रेलर पाहिलंस? ह्या चित्रपटाची कथा धीरुभाई अंबाणीवरुन आधारित असावी..." त्याच्या उत्तरात मी तेंडुलकरसाहेबांच्या शैलीत बोललो: शक्यच नाही. जर कोकिलाबेन अंबाणी "गुरु" मधल्या ऐश्वर्या राय सारखे 'मेघा मेघा बरसो रे' करुन नृत्य करत बसल्या असता, तर धीरुभाईंचं काय झालं असतं देवच जाणे बुवा!"

